नकारात्मक भावना आणि मानसशारीरिक आजार
मन आणि शरीर यांचं नातं अतूट आहे. मनातील भावना जशा आपल्या वागणुकीवर परिणाम करतात, तशाच त्या आपल्या शरीरावरही परिणाम घडवतात. विशेषतः नकारात्मक भावना – जसं की भीती, चिंता, राग, दुःख, तणाव आणि अपराधीपणा – UK Replica offers a variety of 1:1 best fake rolex GMT-Master II, high quality fake rolex GMT-Master-II.या दीर्घकाळ मनात राहिल्यास त्या शरीरात विविध आजारांना जन्म देतात. असे आजार जे मानसिक कारणांमुळे शरीरात निर्माण होतात, त्यांना “मानसशारीरिक” (psychosomatic) आजार म्हणतात.
नकारात्मक भावनांचा परिणाम :
जेव्हा एखादी व्यक्ती सतत चिंतेत, भीतीत किंवा तणावाखाली राहते, तेव्हा तिच्या शरीरात अनेक रासायनिक बदल होतात. मेंदू सतत “धोक्याची सूचना” देत राहतो आणि त्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालिन या तणाववर्धक हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम म्हणजे – झोपेचा अभाव, पचन बिघडणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि अखेरीस विविध आजार उद्भवणे.
मानसशारीरिक आजार कोणते असू शकतात?
नकारात्मक भावना दीर्घकाळ मनात साठवून ठेवल्यास खालील आजार होऊ शकतात:
हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब)
हृदयरोग
डोकेदुखी (मायग्रेन)
अल्सर त्वचेचे विकार (सोरायसिस, अॅलर्जी इ.)
दमा किंवा श्वासाच्या तक्रारी
अनिद्रा (झोप न लागणे)
हॉर्मोनल इंबॅलन्स
या सर्व आजारांचे मूळ थेट शरीरात नसते, तर मनात असलेल्या तणावात असते.
उपचाराचे मार्ग :
उपचारांमध्ये रिलॅक्सशन, योगा, सकस आहार या बरोबरीने EFT खूप लाभदायी ठरते.
प्राचीन चिनी वैद्यकशास्त्रानुसार, आपल्या शरीरात जीवनऊर्जा (जीवनशक्ती – ‘ची’ किंवा ‘प्राण’) विशिष्ट मार्गांनी (meridians) वाहत असते. जेव्हा एखादी नकारात्मक भावना दीर्घकाळ मनात साठून राहते, तेव्हा ती त्या ऊर्जावाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करते. त्यामुळे शरीरात असंतुलन निर्माण होतो, जो पुढे जाऊन psychosomatic diseases (मनोकायिक आजार) यासारख्या समस्यांना जन्म देतो.
याच पार्श्वभूमीवर Emotional Freedom Technique (EFT) ही एक अत्यंत प्रभावी आणि सहज शिकण्यासारखी उपचारपद्धत म्हणून उदयास आली आहे. EFT ला ‘टॅपिंग’ असेही म्हणतात, कारण यात शरीरावरील विशिष्ट मेरिडियन बिंदूंवर बोटांनी हलक्याने टॅप करून नकारात्मक भावना विसर्जित केल्या जातात. या प्रक्रियेद्वारे मनात दडपलेली किंवा सतत फिरणारी नकारात्मक विचारसाखळी शमवली जाते आणि ऊर्जावाहिन्यांतील अडथळा दूर केला जातो.
EFT मध्ये एखाद्या विशिष्ट भावना किंवा त्रासदायक आठवणीचा विचार करताना त्या बिंदूंवर टॅपिंग केले जाते. यामुळे शरीराला ‘सुरक्षित आहे’ असा संदेश जातो आणि मेंदूतील भावनिक प्रतिसादाचा तीव्रपणा कमी होतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की EFT मुळे शरीरातील कॉर्टिसॉल (ताण निर्माण करणारे हार्मोन) चे प्रमाण घटते, मेंदू शांत होतो आणि व्यक्तीला समतोल व शांत अनुभव येतो.
निष्कर्षतः, नकारात्मक भावना म्हणजे केवळ मानसिक अनुभव नसून त्या शरीरावर सुद्धा खोल परिणाम घडवतात. त्या जर वेळेवर हाताळल्या नाहीत तर त्या आपले शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडवू शकतात. अशा वेळी EFT ही पद्धत एक साधी, सुरक्षित आणि परिणामकारक उपाययोजना ठरते. ती केवळ उपचार नाही, तर स्वतःला समजून घेण्याची आणि स्वतःवर प्रेम करण्याची एक प्रक्रिया आहे.
Have a happy healing 

Leave a Reply